समजत होतं आपण जे तिच्यासाठी करतोय ....ते चुकीचे नाही तर....साफ गुन्हा आहे...पण नाईलाज होता त्याचा...बापाच्या प्रोपर्टीसाठी नाही...तर बापाच्या प्रेमासाठी...बापाने आज पहिल्यांदाच काहीतरी मागितलं होतं...आणि ते ही स्वतः च्या फायद्यासाठी नाही...तर एका बापाने आपल्या मोठ्या मुलाच्या सुखासाठी...छोट्या मुलाकडे मागितलेली भीक होती ती...मनात नसुनही त्याने बापाच्या खुशीसाठी हे आव्हान स्विकारले ...आणि महिनाभर तिला भेटायला लागला...तिची आवड निवड माहित असुनही परत एकदा तिच्याकडून जाणुन घ्यायला लागला ... चांदण्या रात्रीत ...तिचा तो उजाळलेला चेहरा पहायला मिळण ...त्याचंही सौभाग्य चं म्हणायचं ...जे काम गेल्या वर्षभरात झालं नव्हतं... आज त्याला बापाने ईच्छेपोटी सुख मिळत होतं...नव्याने ती त्याला कळत होती...ती ही आपल्यात गुंतत चालली आहे हे त्याला