अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग १ दंगा पेटला होता आणि गुंडांच्या हातात सापडू नये म्हणून शलाका सैरा वैरा पळत सुटली होती. पळता पळता, त्या अंधुक उजेडात तिला दिसलं की, एका दुकानात एक माणूस दार उघडून आतल्या खोलीत जातो आहे, शलाकाने क्षणाचाही विचार न करता तिकडे मोर्चा वळवला आणि त्या माणसाला ढकलून आत