अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग ६ (अंतिम) भाग ५ वरून पुढे वाचा ...... “शलाका, मघाशी तू अगदी हलक्या स्वरात म्हणाली की सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं, हे पुन्हा त्याच स्वरात म्हणशील?” – संदीप. आता शलाका चिडली, खरं तर तिला संदीप बद्दल खूपच चांगला रीपोर्ट मिळाला होता, पण मिळालेली माहिती आणि आत्ताचं