#ओळख'काय ठरवले होते आपण आणि हे काय झाले!''आपल्याच वाट्याला हे भोग का?' एक मोठा सुस्कारा टाकून नैराश्याने ग्रासलेला राहुल दादर मार्केट गल्लीतल्या नेहमीच्या दुकानाच्या कट्ट्यावर टेकला.आज रस्त्यावर जरा जास्तच वर्दळ होती.. अलीकडे खूपदा मन अस्थिर असले की तो इथे यायचा.मुंबईमधील रस्त्यांवरच्या गर्दीत आपल्याच तंद्रीत जाणाऱ्या येणाऱ्या गर्दीकडे तो एकटक बघत बसायचा.प्रचंड घाईत धावणाऱ्या मुंबईतील माणसांच्या गर्दीकडे बघताना त्याच्या मनात विचार यायचे...'इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची एक ओळख आहे.प्रत्येकाला कुठे ना कुठे पोहोचण्याची घाई आहे...प्रत्येकाला ज्याचे त्याचे धेय्य आहे....जगण्याचे प्रयोजन आहे...'त्याला प्रश्न पडायचा ' आपले काय?'त्या गर्दीत शून्य नजरेने आपले आस्तित्व राहुल शोधत बसायचा! आई वडिलांचा शहरात जायला विरोध असूनही शिक्षण घेण्यासाठी