भगवत गीता - अध्याय 10

  • 4k
  • 1.6k

अध्याय १० – विभूतियोग श्लोक १श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०-१ ॥भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥ १०-१ ॥ श्लोक २न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०-२ ॥माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदिकारण आहे. ॥ १०-२ ॥ श्लोक ३यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ । असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०-३