अनोखी पैज

  • 9.5k
  • 3.6k

भूषण बऱ्याच वर्षांनी आपल्या काकांच्या घरी गावी आला होता. त्याचा जन्म आणि आणि पूर्ण आयुष्य मुंबईतच गेले होते. लहानपणी तो तसा दरवर्षी गावी यायचा त्यामुळे गावाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती. गावात त्याच्या वयाची मुलं त्याला चांगली ओळखायची पण. तो गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटला. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते त्यामुळे गावात क्रिकेट च्या स्पर्धा भरवल्या जाात होत्या. भूषण त्याच्या गावातल्या संघातून खेळायचा त्यामुळे त्याची नेहमी मित्रांशी भेट व्हायची.एके दिवशी अशेच ते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. आजचा सामना पण ते जिंकले होते त्यामुळे सगळेच उत्साहित होते. गप्पांचा ओघ क्रिकेट वरून गावातल्या घडामोडींवर गेला. गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपासच्या परिसरात कोणीतरी