उत्कर्ष… - भाग 1

  • 13.7k
  • 7.5k

उत्कर्ष…भाग १ नव्या सोसायटीत मनासारखे घर मिळाल्याने आम्ही दोघेही खूश होतो.घरात आवश्यक असलेले फर्निचर करणे चालू होते.दोन महिन्यांत कामे उरकली आणि धुमधडाक्यात वास्तुशांती केली. इथे रहायला आल्यावर एक अनोखी उर्जा अंगात संचारल्यासारखे वाटत होते.आयुष्यात प्रथमच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत होत होता आणि तो आनंद नाही म्हटलं तरी आम्हा दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता.मधल्या काळात ज्यांची समोरासमोर भेट झाली नव्हती असे लोक भेटल्यावर त्यांच्याकडून आम्हाला एक वाक्य हमखास ऐकायला मिळत होते…“ तुम्हा दोघांना रिटायरमेंट आणि नवे घर चांगलेच मानवले आहे बर का! “ते ऐकून छान वाटत होते; पण एक दिवस मात्र आमच्या या आंनदी आयुष्यात वादळ