उत्कर्ष… - भाग 3

  • 6.9k
  • 4k

उत्कर्ष भाग 3 उत्कर्षने घातलेल्या गोंधळामुळे रात्री नीट झोप झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी मी उशिराच उठलो. सकाळची आन्हीके उरकून वर्तमानपत्र वाचायला घेतले होते तेवढ्यात घराची बेल वाजली. समोर उत्कर्ष उभा होता!त्याच्या हातात मला मोठा चॉकलेटचा बॉक्स होता.मी थोडा नाखुशीनेच दरवाजा उघडला."सॉरी अंकल, कल भी आपको मेरी वजह से तकलीफ हो गया, वो क्या है ना, मेरा बर्थडे था ना." आत येऊन तो माझ्या पायाशी झुकला.खरं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला होता, पण त्याचे ते केविलवाणे बोलणे ऐकून मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. या दुहेरी व्यक्तिमत्व असलेल्या तरुणाशी नक्की कसे वागावे तेच कळत नव्हते! रात्री नशेत असताना तो कशाचीच पर्वा करत