उत्कर्ष… - भाग 5

  • 7.2k
  • 4.2k

उत्कर्ष भाग 5 दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी गॅलरीतून उत्कर्षचा अंदाज घेत होतो ...मी पहिले की सकाळी उठून उत्कर्ष त्याच्या गॅलरीतला त्याने करून ठेवलेला पसारा आवरत होता... थोड्या वेळात कुणीतरी कामवाली मावशी त्याच्या मदतीला आली आणि उत्कर्ष तिच्याकडून हवी तशी घराची साफसफाई करून घ्यायला लागला. उत्कर्षने कामवालीला दिलेल्या सूचना मला माझ्या घरात ऐकू येत असल्याने मला घरात बसून खाली काय चालले आहे याचा अंदाज येत होता. उत्सुकता म्हणून सहज खालच्या मजल्यावर डोकावले तर उत्कर्षने दरवाजाच्या बाहेर ओळीत मांडून ठेवलेल्या पंधरा वीस बियरच्या बाटल्या आणि घरातला जमा केलेला खूप सारा कचरा दरवाजाच्या जवळ ठेवलेला दिसला.उत्कर्ष कामवालीला सांगत होता..." दोपहरके पहले ये