उत्कर्ष… - भाग 6

  • 7.5k
  • 4.1k

उत्कर्ष भाग 6(अंतिम भाग) त्या नंतरच्या दिवशी सकाळी बराच वेळ खालच्या फ्लॅट मधून कसलाही आवाज नव्हता.. काल उत्कर्षची बहीण आल्यानंतर सगळे कसे शांत शांत वाटत होते...कसलाच आवाज नाही!अकराच्या दरम्यान मी काही कामानिमित्त खाली गेलो होतो.योगायोगाने रस्त्यात माझी आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीशी गाठ पडली.मला पाहून त्यानेच मला हाक दिली." काय म्हणताय काका? "" काही नाही बघा, मग काय म्हणतोय मग तुमचा उत्कर्ष?"आमच्या बिल्डिंग मधला सध्याचा चर्चेचा विषय उत्कर्ष ने घातलेला गोंधळ हाच होता...मी तो विषय काढताच बिल्डिंग प्रतिनिधी खुलला.... मधल्या दोन तीन दिवसांत घडलेल्या परंतु मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी मला आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीने सांगितल्या. त्या दिवशी उत्कर्षची पोलीसात तक्रार झाली होती