दाटून कंठ येतो!आजकालनं बसमध्ये,ट्रेनमध्ये खिडकीतून बाहेर बघत बसलो की डोळे भरून येतात हो आणि माझ्याही नकळत वाहू लागतात. तसा भावनाविवश वगैरै नाही मी पण..पण काय सांगू सई,लेक माझी चोविशीची झाली आणि माझ्याच एका मित्राने एक स्थळ सुचवलं तिच्यासाठी. गडगंज श्रीमंती,मुलगा अमेरिकेत वास्तव्याला. मी नाही म्हणालो. अहो, अमेरिका काय जवळ आहे! लेकीचं दर्शन व्हायचं कसं? असं हो नाही करत चार दिवसापुर्वी आमच्या दिगंबर अण्णांनी एक स्थळ आणलं. मुलगा कोकणातला आहे. तिथे पोस्टात कामाला आहे. आई,वडील,बहीण,भाऊ,घरदार सगळं काही आलबेल आहे. नाव ठेवण्यासारखं मुलात काहीच नाही. ती पाहुणेमंडळी माझ्या सईला पहायला आली. दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. मुलाला मुलगी व मुलीला मुलगा जोडीदार म्हणून