दाटून कंठ येतो Geeta Gajanan Garud द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दाटून कंठ येतो

दाटून कंठ येतो!


आजकालनं बसमध्ये,ट्रेनमध्ये खिडकीतून बाहेर बघत बसलो की डोळे भरून येतात हो आणि माझ्याही नकळत वाहू लागतात. तसा भावनाविवश वगैरै नाही मी पण..पण काय सांगू सई,लेक माझी चोविशीची झाली आणि माझ्याच एका मित्राने एक स्थळ सुचवलं तिच्यासाठी. गडगंज श्रीमंती,मुलगा अमेरिकेत वास्तव्याला. मी नाही म्हणालो.


अहो, अमेरिका काय जवळ आहे! लेकीचं दर्शन व्हायचं कसं? असं हो नाही करत चार दिवसापुर्वी आमच्या दिगंबर अण्णांनी एक स्थळ आणलं. मुलगा कोकणातला आहे. तिथे पोस्टात कामाला आहे. आई,वडील,बहीण,भाऊ,घरदार सगळं काही आलबेल आहे. नाव ठेवण्यासारखं मुलात काहीच नाही. ती पाहुणेमंडळी माझ्या सईला पहायला आली. दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. मुलाला मुलगी व मुलीला मुलगा जोडीदार म्हणून पसंत पडला. साखरपुड्याची व लग्नाची तारीखही ठरवली. मे महिन्याच्या एकविसतारखेला साखरपुडा व बावीसला लग्न करायचं ठरवलं.


लग्न आमच्याकडे मुंबईत. पाहुणेमंडळी जायला गेली आणि मला हे जे काही घडलं ते खरं होतं यावर विश्वास बसेना. माझी लेक,माझा जीवच हो. दोन महिन्यांनी मला सोडून जाणार या विचाराने रात्रीची नीज येत नाही.


तिचं लहानपण डोळ्यांसमोरुन सरकू लागतं. सईचं नाव ठेवताना आम्ही किती विचार केला होता! लहानसं,सोप्पं नाव ठेवायचं होतं आम्हांला. शेवटी हिलाच सुचलं सई, आम्हाला सोबत करणारी आमची सई. लहानपणी रात्री खूप रडायची हो. कित्येक रात्री जागून काढल्या आहेत सईला खांद्यावर फिरवत. बसूच देत नव्हती. बसलं की भोंगा पसरायची. हळूहळू रांगू लागली. पहिला शब्द बाबा बोलली होती तेंव्हा किती आनंद झाला होता आम्हाला. सईनंतर मुल झालंच नाही आम्हाला. डॉक्टरी उपचार बरेच केले पण व्यर्थ. शेवटी सईलाच सर्वस्व मानलं आम्ही.


मला अजुनही आठवते तिच्या हातची करपलेली पहिली पोळी व बाबा तू खाल्लीच पाहिजेस असा तिचा लाडिक आदेश. मी लाकडी भातुकली आणलेली सईसाठी. त्यात

भातुकलीचा स्वैंपाक करुन इवल्याशा ताटातून मला खाऊ घालायची. तिची आई कधी तिच्यावर चिडली,रागावली तर माझ्यापाठी येऊन लपायची. लहानपणी माझ्याच ताटात जेवायची.


शाळेत जाताना माझी पापी घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडायची नाही आणि चुकून विसरली तर दप्तर पाठीवर भेळकांडत तशीच माघारी यायची धावत. पापी घ्यायची मगच जायची .कुठेही काही खाऊ मिळूदेत अगदी तिळगुळसुद्धा खिशातून माझ्यासाठी आणायची व मला भरवायची. संध्याकाळी समोरच्या झाडावर चिमण्या जमायच्या मग मी तिला म्हणायचो की चिमण्यांची शाळा भरली. सईला खरंच वाटायचं ते.


अभ्यास वाढल्यावर मग ती अभ्यासात गुंतू लागली पण तरीही माझी एखादी वस्तू हरवली की तीच पहिली हुडकून काढते. मला लिंबुसरबत,चहा बनवून देते व कसा झालाय म्हणून विचारते. कितीही दमुनभागून घरी गेलो तरी सईचा हसरा चेहरा पाहून सगळा ताण,मरगळ कुठच्याकुठे निघून जाते. आम्हा दोघांच्या औषध गोळ्यांच्या वेळा सईला पाठ आहेत. कसलीही कुरबूर न करता औषध घ्यायला लावते ती. सध्या तर मला सईत माझी आईच दिसते.


सईला जर रागोबा आला तर उपोषणालाच बसते मग तिला मस्का लावायलाही बाबाच लागतो. तिथे सासरी अशी फुगून बसली व कोणी बाबापुता केलं नाही तर उपाशीच राहिल माझी लेक.


बरं ही एवढी सरळमार्गी आहे की कधी कोणाला दुखावणार नाही पण तिला कोण टोचून बोललं तर लगेच गंगायमुना वाहू लागतात सईच्या डोळ्यातून. इथे मी पुसतो तिचे डोळे पण तिथे?.. छे..का देवाने ही रीत बनवली लेकीला सासरी पाठवण्याची? कसं आम्ही कन्यादान करणार आमच्या पोटच्या गोळ्याचं? जेंव्हा पाठवणी वेळी माझी सई रडेल तेंव्हा कसं सावरणार मी? सई सासरी गेली की हे आमचं घर आम्हा दोघांना खायला उठेल. तिची ती सतत चालणारी चिवचिव,खाऊ दे करुन मागं लागणं,घरात इकडून तिकडे बागडणं हेच तर जीवन होतं आमचं.


खरंच, सई निघून गेली की फार मोठी पोकळी निर्माण होईल आमच्या आयुष्यात. देवा तुच बळ दे रे बाबा यातून सावरायला.


----गीता गजानन गरुड.