Pickled pickles books and stories free download online pdf in Marathi

मुरलेलं लोणचं

चल थाटुया नव्याने संसार!

©®गीता गरुड.

गिरीधर: "हेलो हेलो,मी गिरीधर बोलतोय."

दुर्गा: "होय ओ कळला माका. सदी वळख पटवून देव्ची लागता काय! नायतरी हे वक्ताक माका म्हातारेक फोन कोनाचो येतलो श!"

गिरीधर: "कशी आसस दुर्गे,बरी आसस म."

दुर्गा: "वायच ढोपरा धरलीहत. चलायचाच."

गिरीधर: "कामा आटापली?"

दुर्गा: "कामा..खयची कामा! सकळ बाई येता नि भाजीचपाती करुन जाता. तेतुरल्याच रातीक गरम करुन खातव. बरा ताज्या करुन खाईन तर मग सगळ्यांचे चपाते करूचा काम माजे गळ्यात मारतीत. माका आतासा गेसजवळ उभ्या रव्हाक घोपान हा काय. सूनबाय,तिची आव्स इली काय मातुर तिका स्वतःच्या हातीन चपाते करून घालता,भाकरी थापता,दोसे करता. माज्यासाठी दोन चपाते बनवूक येळ नाय गावना तिका."

गिरीधर: "तुया नको मनाक लावून घेव्स. असो इचार करत बसलस तर बीपी वाढतलो."

दुर्गा: "छ्या! मी बर्फाची लादी ठेवलय मिया टकलेर,अगदी लगीन झाल्यापासना. तुमची आव्स काय कमी छळ करी माजो! भाजीत मीठाचो अधिकचो खडो घालून ठेवी नि माका तोंडघशी पाडी. मुंबईक खोली होती ती धाकट्या लेकाच्या नावावर करुन दिल्यान. खर्चासाठी आमच्याहारी सदी हात पघळी. बबूवैंनीची ,राधावैनीची लग्ना, त्यांच्या पोरांची बारसी ..फकस्त देत रव्हलात. दानशूर कर्ण ना तुमी."

गिरीधर: "आत्ता कसा माझी दुर्ग्या शोभलस बघ."

दुर्गा: "जवळ असताना नाय कवा दुर्गी म्हनान साद घातलास. अगं ए..म्हनान साद घाली हुतास."

गिरीधर: "नाय गो नाय जमला माका. आत्ता फोनवरून बोलतय ना तुका दुर्गी..दुर्गे."

दुर्गा: "आयकाक लयच गॉड वाटता ओ,तुमच्या तोंडान माजा नाव."

गिरीधर: " गो लाजलस.."

दुर्गा: "इस बाय!"

गिरीधर: "तुका सांगतय दुर्गे,आत्ता माका पश्चताप होतोहा. दोनव लेक मोठी घरा घेतले म्हनल्यार तेंका होता नव्हता ता पुडक्या देऊन बसलय. ता पुरंना म्हनान कष्टान काडीकाडी गोळा करुन इकत घेतलला घरव इकलय. तेव पैसं तेंका वाटून दिलय नि लेकांनी आवशीबापाशीच फाळणी केल्यानी. आपलेच दात नि आपलेच व्हट कुनाक बोलतलस! तुया थय थोरल्याथय मुंबयक नि मिया हय धाकट्याहारी पुन्याक. कवातरी सह मह्यन्यान आपली भ्याट घडवून आनतात,झाला."

दुर्गा: "त्या भेटीत त्यांचाच गेट टुगेदर चललला असता. आपनाक सावशित,एकांतात बोलाक येळ खय गावता! एका नातवाक आज्जीच्या हातचे कोंबडीवडे व्हये होतत तर दुसऱ्याक खापरोळे. माकाव नातवंडांका करुन घालूक आवडता ओ,पुन आपनाक अप्रायव्हसी वायच तरी देवूक व्हयी का नाय तेंच्यानी! आपुन कसे कवंडाळा आवशीबापाशीच्या गळ्यात मारून बायलेंका घेऊन पिच्चराक जातत! सगळं बोलूनच दाखवुचा लागता काय!"

गिरीधर: "दुर्गे,कल मिया आपल्या नातवाक, क्रीशाक गार्डनात खेळाक घेऊन गेललय. मिया जरा सावळेत बसलय. तळमजल्यावरच्या नेन्यांवांगडा बोली व्हतय. तितक्यात कसलो गोंधळ आयकाक इलो. आपलो क्रीश हळूच गार्डनच्या गेटभायर पळाला होतो. तेना घरात गावलेला पाचाचा नाणा खिशातून व्हरलला आनि त्याचा चाकलेट घेऊचेसाठी तो रस्तो ओलांडीत समोरच्या दुकानाहारी धावी हुतो. कुनाचीतरी गाडी अगदी ततेच्या इचभर अंतरावर येऊन थांबली..ब्रेक दाबल्या कारनान केदोतरी मोठो अनर्थ टळलो हुतो.
तिनसाना सूनबाय इली. तिका झालेलो सगळो प्रकार नेन्यांच्या सुनेन मीठमसालो लावून सांगलो व्हतो. सूनबाय निसती धुमसी व्हती. न्हवरो इल्याबरूबर तिच्या तोंडाचो पट्टा सुरु झालो, गिरनीच्या पट्ट्यासार फाटफाट. माका मेल्याहून मेल्यासारखा झाला. आजकल माझी अडचन होऊक लागली हा दोघांका. तुया तरी घरकाम करतस. माझी फक्त बँकेत पासबुकावर एन्ट्री करुन आनना,इजेची बीला भरना..येदीच मदत. इजेची बीलाव हाली तेंची ती भरतत म्हना."

दुर्गा: "नका ओ मनाक लावून घेऊ. सुनांच्या राज्यात ह्या चालायचाच. आपले झिल तरी काय कमी आसत? आवशीबापाशीक सांभाळना,तेंची इचारपूस करना ही झिलांचीव जवाबदारी आसता. ऐकलास, हाली आपलो धाकटो, बंड्या भाषान करुचो कमी झालो माझ्यावांगडा. पयले जेवून चूळ भरली काय ताँड फुसूकव माजो पदर लागी तेका..आत्ता इलो काय मोबाईल हातीत घेऊन बसललो असता. सुनबाईव तसलीच. मिया डाळभाताचो कुकर लावून ठेवतय,भाजी करतय पुन आई,भाजी छान झालीय ओ असा कवा हेच्या तोंडून येत नाय. उलट अळूचा फतफता करावा तर आमच्या आईनच असा वर तालड करून बोलता. तुमी किती आवडीन खाईत व्हता माझ्या हातचा फतफता."

गिरीधर: "दुर्गे,तुझ्या हातची चव चाखूक जीव आसुसलोहा माझो. म्हनानच मिया एक खोली भाड्यानं घेवची ठरवलीहा. आपलो शिरसाठ रव्हता ना जनता चाळीत..थय येक खोली रिकामी आसा म्हनी होतो. तशा दोनचार एफड्या आसत माझ्या. मोडू एकारदी आनि पुन्हा थाटू नव्यान दोघांचो संसार."

दुर्गा: "अय्यो खराच!"

गिरीधर: "होय गो,अगदी खरा. या येत्या दिपवाळीअगुदर जावया जोडीन रव्हाक."

समाप्त



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED