नरकपिशाच - भाग 2

  • 7.2k
  • 4.8k

द- अमानविय..... सीजन 1 ... ..... आग्यावेताळ भाग 2 ...     " स्स्स ... स्स्स्स साहेब.! आम्हाला तिथ येताळाची मूर्ती सापडलीया.!" फुग्याच्या तोंडून निघालेल्या ह्या वाक्यासरशी वातावरणात काहीक्षण विशिष्ट प्रकारच्या ( व्हू, वूहू ) आवाजासहित हवा वाहू लागली . हवेने जंगलातली झाड डावीकडून-उजवीकडे झुकली जात हेलकावे खावू लागली, हवेच रुपांतर वादळी हवेत होऊन जात आकाशात काळे ढ़ग जमा होऊ लागले. हवेने प्रत्येकाच्या डोक्यावरचे केस उडत होते . फक्त राकेश सोडुन कारण त्याच्या डोक्यावर safety hat होती. वातावरणात काळपट ढगांचा कालपट प्रकाश पडला जात वा-याचा वेग वाढू लागला . डोळ्यात कचरा नको जायला म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या चेह-यासमोर हात धरुन ठेवलेला.