नरकपिशाच - भाग 5

  • 5k
  • 1
  • 3k

द- अमानविय..... सीजन 1 ........ आग्यावेताळ भाग 5 ... पाषाणवाडीत उगवणारे सूर्यदेव आज जरा घाईतच होते.कारण आज एन सहा वाजताच पाषाणवाडीत सुर्यदेव बुडाले जात कालोख पसरायला सुरुवात झालेली. डोळ्यांत काजळ फासाव, असा कालोख चौहू दिशेंना अंधकाळ प्रमाणे मिरवू लागलेला. काळ्या रंगाचे कावळे थव्या-थव्याने काव, काव करत आकाशातुन उडून घरी जाण्यासाठी निघालेले. तर त्या विरुद्ध रक्तपिपासु वटवाघळू आप-आपल्या घरातुन बाहेर पडलेले, महांक्राल बाबांनी सांगितलेल्या नियमावलीच पाळन सर्वांनी कठोरतेने पाळण्यास सुरुवात केलेली , कारण एन सहा वाजताच पुर्णत पाषाणवाडी सुनसान झालेली, स्मशान शांततात पसरलेली पुर्णत गावात .जणु कोणी मेल असाव, वारल असाव, दुर कोठून तरी जंगलातल्या कोल्ह्ययांचा भेसूर रडण्याचा आवाज येत होता