हरिश्चंद्रगडावर - भाग 1

  • 10.6k
  • 5.1k

केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतर दोन तीन आठवडे सर्दी आणि खोकल्याने सगळे बेजार झालो होतो.जरा कुठे बरं वाटायला लागले नाही तर लगेच नवऱ्यानं जाऊया का एखाद्या ट्रेकला.?"अरे, आताशी कुठं थोड बरं वाटतंय. पुढच्या महिन्यात जाऊया. तुला जायचं असेल तर तू जा."माझं हे निर्वाणीच बोलणं ऐकून आमच्या साहेबांनी चेहरा पाडला."तुला माहीत आहे . मी एकटा तुझ्याशिवाय ट्रेकला जात नाही. राहुदे, बघू पुन्हा कधीतरी."स्वारी अशी बोलली खरी . पण चेहरा उतरलेलाच होता."बरं बाबा, चल जाऊया. पण जरा सोप्पा ट्रेक बघ."पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राजे लगेच ट्रेकग्रुप वर येत्या आठवड्यातील अपडेट पाहू लागले."हरिश्चंद्रगड जाऊया. पाचनाई मार्गे आहे. मार्ग जास्त अवघड नाहीये आणि आपण