हरिश्चंद्रगडावर - भाग 2

  • 6.4k
  • 3.2k

रात्री कुठं कुठं गाडी थांबली रस्त्यावर किती ट्रॅफिक जाम लागली याचा मला जराही थांगपत्ता लागला नाही. पहाटे पहाटे कुठंतरी गाडी थांबली होती. बहुतेक फॉरेस्ट चेकपोस्ट असावं .. हळूच खिडकीची काच सरकवून बाहेरचा अंदाज घेऊ लागले. सपकन पावसाची एक सर तोंडावर आली. बाहेर पावसाची संततधार सुरूच होती. मी बसमध्ये पाठी वळून बघितले तर रात्री जागुया म्हणणारे हवशे गवशे मस्त गाढ झोपेत होते. साधारण तासभरात आम्ही पाचनाईला पोहचलो. बस पार्किंग करत असताना तिथं अगोदरपासूनच उभ्या असलेल्या बसेस आणि कार बघून आज गडावर नक्कीच जत्रा भरणार याची खात्री पटली.हल्ली त्या इंस्टाग्रामवर रिल्स टाकून स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणाईचा कल गड किल्ल्यांवर वाढू लागला