हरिश्चंद्रगडावर - भाग 4

  • 3.8k
  • 1.7k

कोकणकडा म्हणजे सह्याद्रीतील एक सुंदर आविष्कार .सुंदर तेवढाच थरारक आणि रौद्र. साधारण अर्धा किलोमीटर परीघ असलेला हा कडा एखाद्या चंद्रकोरीच्या आकाराचा आहे. याचं सौंदर्य पाहायचे असेल तर पावसाळ्यानंतर धुकं नसताना जावे. इथून कोकणचे दर्शन होते म्हणून याला कोकणकडा म्हणत असावेत बहुतेक.गडावरील मंदिरापासून अर्धा तास चाललो की आपण कोकणकड्यावर पोहचतो. ऐन पावसाळ्यात दाट धुकं आणि आजूबाजूचे घनदाट जंगल त्यामुळे सोबत गाईड असावा. मी आणि अनिल अगदी रमतगमत बागेत फिरायला आल्यासारखं फोटो काढत व्हिडिओ बनवत चाललो होतो. तेवढ्यात आजूबाजूला कोणीच नाही हे आमच्या लक्षात आलं. सगळे पुढं निघून गेले होते. तसं काही आम्ही घाबरलो नव्हतो. पण आमचा चालण्याचा वेग सांगत होता आमची