१ तास भुताचा - भाग 2

  • 7.3k
  • 4.3k

लेखक.!- जयेश.. झोमटे.. नवरात्रीचा गोंडा... रात्रीचा किरर्र काळोख पसरलेला . जंगलातले रातकीडे विशिष्ट प्रकारच्या आवाजाने किर्र, किर्र्त मृत्युगीत गात होते. पिवळ्या रंगाच चमकणा-या काजवाच प्रकाश जणु हडळीच्या पिवळ्याजर्द डोळ्यांप्रमाणे भासून येत होत. कोकनातल्या जंगलात आज जाड धुक पसरलेल, त्यासमवेतच वातावरणात पसरलेली निरव शांतता ह्या सर्व वातावरणातल गुढपण आणखीणच वाढवत होती . चंद्राची सावली झाडांवर पडली जात , फांद्याच त्या सावलीत अक्राल-विक्राळ भयंकर रुप तयार झालेल. दुर कोठून तरी एका पुरुषाची आकृती धावतच चंद्राच्या उजेडात जंगलात शिरुन आली. त्या पुरुषाच्या चेह-यावर वाढलेली दाढी, मोठ्या भुवया होत्या . अंगावर एक काळ्या रंगाचा सदरा व खाली एक सफेद रंगाचा धोतर घातलेला . त्याच्या