ती भयाण रात्र

  • 8.5k
  • 1
  • 3.1k

"आई कशी आहे आता फोन केलास का तू?" अंजली अभिजितला विचारत होती. अभिजित व त्याचे काही मित्रमैत्रिणी सगळे समुद्रकिनारी फिरायला गेले होते. सलोनी, अंजली, दिशा, अभिजित, रुद्र व राजवीर यांची चांगली मैत्री होती. दोन तीन दिवसाचे नियोजन करून ते आले असले तरी आज एका फोनमुळे ते लगेच घरी निघाले होते. "नाही! घाटात फोन लागत नाहीये" अभिजित थोडा तणावातंच बोलला. "अभ्या तू नको काळजी करू, आपण वेळेत पोहचू तिथे" रुद्र त्याला समजावत बोलला. तसा तो गाडी चालवतच 'हुं' म्हणाला. अभिजित हा आपल्या आईसोबत मुबंईमध्ये राहायचा. वडील तो लहान असतानाच त्यांना सोडून गेले होते. त्यामुळे आईच त्याचं जग होती, त्याचं सर्वस्व होती.