ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 2

  • 5.8k
  • 3.9k

प्रकरण दोन. ओजस,पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस मधे आला.आज जरा निवांत वाटत होता.अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर , पाणिनी पटवर्धन समोर , खास त्याच्या पद्धतीने बसला. आपले दोन्ही पाय गुढग्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेऊन आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर टेकवून. “ पाणिनी अचानक तुला कुक्कुटपाल कंपनी मधे कसा काय रस निर्माण झाला ?” “ मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक.” पाणिनी ने गुगली टाकला.त्या दोघात कायमच असे वाक् युद्ध चालायचे. “ ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूचीच कंपनी वाटते मला.मधेच ती जिवंत होते,मधेच गायब होते.” “ म्हणजे? ” पाणिनी ने गोंधळून विचारले “ म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात