अंगडिया स्टोरी - भाग १

  • 4.4k
  • 2.1k

अंगडिया स्टोरी भाग  १ मुकेश अंगडिया सकाळी साडे नवाच्या सुमारास ऑफिस मधे नुकतेच पोचले होते. इतक्यात त्यांच्या ऑफिस मधला फोन वाजला. मुकेशनी फोन उचलला. मुंबईहून लाइटनिंग कॉल होता. किरीटभाई बोलत होते. “कलकत्याहून दिनेश निघाला आहे. आज अडीच वाजता हावरा मुंबई एक्सप्रेस नागपूरला पोचेल. ठरल्या प्रमाणे ठरलेली १० रुपयांची नोट घेऊन स्टेशन वर जा आणि किट बॅग ताब्यात घ्या. घरपोच डिलीव्हरी आहे. त्या प्रमाणे ती सरक्षित पणे पोचवा. आणि डिलीव्हरी ची पावती घ्या. आणि आम्हाला पाठवा.” मुकेश भाईंनी होकार भरला. हे नेहमीचं नव्हतं पण कधी कधी अशी डिलीव्हरी करावी लागायची. आज भारतात अनेक कोरियर सर्विसेस आहेत, आणि आपण त्यांचा जरुरीनुसार वापर