अंगडिया स्टोरी - भाग ३

  • 4.9k
  • 2.3k

 अंगडिया स्टोरी भाग  ३ भाग २  वरुन पुढे वाचा ...... थैला अजूनही सीलबंद होता. पंचनामा करून त्या थैल्याची नोंद करण्यात आली. सर्व जणांचे बयाण पण नोंदवण्यात आले. थैला मुकेश अंगडियाचा  होता हे स्पष्ट झालं होतं. आता प्रश्न हा होता की चोरी होऊनही संबंध दिवसभरात मुकेश भाईंनी पोलिस स्टेशन मधे तक्रार का नोंदवली नाही. ती केली असती तर आत्ता पर्यन्त शहरातल्या सर्व ठाण्यांना त्यांची माहिती मिळाली असती. रात्र बरीच झाली होती रात्रीचे 3 वाजले होते, म्हणून साहेबांनी विचार केला की उद्या सकाळी सकाळी मुकेश भाईंना बोलाऊन घेऊ. मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. सकाळी पोलिसांनी फोन करून मुकेशभाईंना गणेश पेठ पोलिस स्टेशन