अंगडिया स्टोरी - भाग ४ - अंतिम भाग

  • 4.9k
  • 2.6k

अंगडिया स्टोरी भाग  ४ (अंतिम) भाग ३  वरुन पुढे वाचा ...... “लिलाव कोण करणार आहे?” – इंस्पेक्टर साहेब. “आत्ता तरी मला माहीत नाही साहेब, पण हे लिलाव करणारे सरकारमान्य असतात. सरकार दरबारी त्यांची नोंद असते. असे लिलाव होतात तेंव्हा सर्व बाबी ठरल्यावर सरकारला त्यांची माहिती कळवल्या जाते. त्यांच्या कडून ओके आल्यावरच लिलावांची तारीख आणि स्थळ जाहीर होतं. योग्य वेळी पोलिसांना पण सूचना दिल्या जाते. लिलाव कोण करणार हे, समोरची पार्टी कोणाला कॉंट्रॅक्ट देते त्यावर अवलंबून आहे. ते त्रिलोक भाईंना पण माहीत असण्याची शक्यता नाही.” – किर्तीभाई. “जर कोणालाच काही माहिती नाही, तर त्रिलोक भाईंना बातमी  कशी कळली?” - इंस्पेक्टर “एका