ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 7

  • 5.2k
  • 3k

प्रकरण सात पाणिनीपटवर्धन आपल्या ऑफिस ला आला आणि आपल्या जवळच्या किल्लीने दाराचे लॅच उघडले.आत पाहतो तर सौम्या टेबला वर डोके ठेऊन, हात उशाशी घेऊन चक्क झोपलेली दिसली. “ काय ग अजून घरी नाही गेलीस? ” पाणिनी ने विचारले. “ तुम्ही काया बरोबर गेलात तिथे काय झालं त्याची उत्सुकता होती त्यामुळे थांबले इथेच ” सौम्याम्हणाली. “ जेवण तरी झालाय का तुझं?” “ नाही , मी बाहेरून सॅण्डविच मागवले फक्त.” “ तू आता तातडीने घरी जा.इथून पुढे मी तुला कायम माझ्याच बरोबर नेत जाईन म्हणजे तुझ्या खाण्या पिण्याची अळंटळं होणार नाही”पाणिनी म्हणाला नंतर पाणिनी ने तिला सर्व हकीगत कथन केली.नंतर पाणिनी तिला