प्रकरण १० “सौम्या , प्रणव पालेकर नावाच्या माणसाला शोधायला आपण अत्ता बाहेर पडलोय.”पाणिनी म्हणाला. “ कसा आहे हा माणूस?” सौम्याने विचारणा केली. “ भयंकर हट्टी, बैला सारखे डोके , अशी मूर्ती डोळ्यासमोर येते.मी बघितलेलं नाही त्याला अजून ”पाणिनी म्हणाला. थोड्याच वेळात ते दोघे पालेकर च्या दारात उभे होते. “ मला पालेकर ला भेटायचं होत. ”पाणिनी म्हणाला. “ तुमच्या समोर उभा आहे त्या देहाला तेच नाव आहे.”पालेकर म्हणाला. रुंद छातीचा ,भडक कपड्यातला माणूस त्याच्या समोर उभा होता. “ कोण तुम्ही? ” “ या देहाला पाणिनी पटवर्धन म्हणतात , लॉयर ! ”पाणिनीने त्याच्याच भाषेत उत्तर दिले. पाणिनी पटवर्धन हे नाव ऐकताच त्याच्या