१ तास भुताचा - भाग 11

  • 4.1k
  • 1.7k

भाग 2 फसगत वर आकाशात पांढराशुभ्र चंद्र उगवला होता. परंतु कधी कधी मोठ मोठे काळे ढग मध्ये येऊन चंद्राचा तो प्रकाश लपवत होते.काळे ढग चंद्रासमोर येताच जमिनीवर अंधार पसरत होता. रक्तपिपासु अंधार. रातकिंडयांच्या किर्रकिर्रण्याचा आवाज चौही दिशेना प्रेतयात्रेत वाजणा-या टाळांसारखा ऐकू येत होता.कधी- कधी एक घुबड घुत्कारत होती, कसल्यातरी अनाहुतपणाची चाहूल देऊन जात होती.अंधारात पाहताच कोणीतरी काळे कपडे घालुन, त्या अंधारात उभा आहे ,वावरत आहे असं भास होत होता.एक एक पाऊल वाढवत हातात पिवळ्याजर्द विजेरीचा प्रकाश घेऊन धुक्यातुन वाट काढत धाऊ पुढे पुढे निघाला होता.लक्ष जरी विजेरीच्या प्रकाशाने उजळून निघणा-या पायवाटेवर असल, तरी मनात मात्र वेगळेच विचार चालू होते.काहीवेळां अगोदर