१ तास भुताचा - भाग 16

  • 4.3k
  • 1.7k

भाग 16 प्रेमाची ताकद 1 भाग 1 जंगलातल्या मातीच्या रसत्यावरुन ती चार चाकी गाडी मंद वेगाने धावत होती. गाडीच्या हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात पुढचा नऊ फुट लांबीचा सरळ गेलेला रस्ता दिसत होता. आजुबाजुला कमरे इतकी वाढलेली हिरवी झुडपे आणि त्यांपुढे झाडांची गर्दी ऊभी होती. अंधारातुन रातकीड़यांची किरकर गाडीच्या बंद काचांना ठोठावत होती जणु त्यांना गाडीआत जाऊन किंचाळायच होत, आवाज द्यायचा होता. गाडीत सीटवर अभय वय सव्वीस उर्फ अभी बसला होता. त्याच्या बाजुलाच सीटवर अंशुना उर्फ अंशू वय पंचवीस बसली होती. मुलगी आहे म्हंणजे काही वेगळ विचार आणु नका! दोघेही मित्र होते , शहरात राहायचे, म्हंणायला अभी काही शहरातला नव्हताच, तो ह्या