१ तास भुताचा - भाग 17

  • 4.2k
  • 1.6k

प्रेमाची ताकद 2 भाग 2 अंत मार्गक्रमण . काल्पनिक कथा.सदर कथेत मृतांची विधी काल्पनिक आहे. कृपया कथेवाटे कोणत्याही गैर प्रयोग , अंधश्रद्धेला लेखकाला खतपाणी घालायचं नाही. लेखकाने कथेत भीतीची उच्चांक सीमा गाठली आहे. म्हणूनच कथा आपल्या निर्णयावर ठाम होऊन वाचावित.!अभीच्या घराच्या उघड्या चौकटीपुढे हॉलमध्येच अभी भुईवर पालथा पडलेला दिसत होता."अभी वाचव , वाचव मला ! अभी हैल्प !"अभीच्या बंद पापण्यांआड कानांवर अंशूचा आवाज येत होता. शेणाने सारवलेल्या भुवईवर तो दोन्ही हात पुढे करुन पालथा पडलेला, डोळ्यांच्या बंद पापण्यांवर दोन्ही गोलसर बुभळे डावीकडुन-उजवीकडे हलतांना दिसत होती, कानांवर तोच तो ओळखीचा आवाज पुन्हा पुन्हा घुमत होता. " अभीऽऽऽऽ! अभी वाचव मला, अभीऽऽऽऽऽ!"