प्रेमाची ताकद आंतिम भाग 3 अंत. वातावरणात चांगलच गारवा भरायला लागला होता. मंद धुक्याचे वलय आजुबाजुच्या परिसराला झाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना...यश? यश मात्र काही येत नव्हत. तरीही त्यांचा चोरटा प्रयत्न मात्र सुरु होता.निल्या आकाशात चांदणीरुपी स्फटिक चमकत होते. त्यांचांच निलसर प्रकास माटळ्यावाडीवर पडला होता.अभीची चार चाकी गाडी उभी दिसत होती- गाडीच्या पुढेच, अभीच घर होत. घराच्या पायरीवरच समर्थ त्यांच्या अभीला बसलेला दिसत होता. " अभी तुझ हे जन्मस्थान ,म्हंणजेच ही माटळ्यावाडी एक नास्तिक लोकांच गाव आहे. एक अस गाव जे देव, प्रकाश , शुभ -लाभ ,सत्य अस काहीच मानत नाही.जर हे अस का? विचारशील ? तर त्या मागे