आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट

  • 15.4k
  • 1
  • 8.6k

कृतिका चे लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते.तिच्या सासरी महालक्ष्मी चा सण होता. सगळे जण तयारीला लागले होते. तिच्या सासरी तिचे सास, सासरे, पती आणि तिच्याच वयाची नणंद असे सगळे होते.सासूबाई कृतिकाला हाताशी घेऊन जय्यत तयारीला लागल्या."सूनबाई जरा ते लॉफ्ट वरचे पुरण यंत्र काढून दे बरं",कृतिकाच्या सासूबाई"हो सासूबाई",कृतीकाखरं तर पुरण यंत्र घरच्या एखाद्या पुरुषाने काढून दिलं असतं तरी चाललं असतं पण सासूबाईंना कृतिकाच्याच कडून सगळे कामं करून घ्यायचे होते.कृतिकाने स्टूल वर चढून पुरण यंत्र काढून दिलं"सूनबाई ह्या भाज्या चिरून दे""हो सासूबाई""सूनबाई हे लसूण निवडून दे""हो सासूबाई""सूनबाई हे पुरण यंत्रातून काढून दे""सूनबाई ही डाळ वाटून दे""सूनबाई हे वडे तळून घे"अश्या