तू फक्त माझाच

  • 10k
  • 1
  • 3.9k

राकेश आणि रिया यांचं लग्न अगदी दणक्यात झालं, राकेश चे वडील गंगाधरराव आणि आई सुमतीबाई यांना फार फार आनंद झाला,राकेश हा त्यांचा एकुलताएक मुलगा होता त्यामुळे मुलीची हौस त्यांची पुरी झाली नव्हती आता लक्ष्मीच्या पावलाने आलेली रिया म्हणजे आपल्याला लेकच मिळाली असं त्यांना वाटलं. रिया आणि राकेश चा संसार सुरू झाला, रिया फारच लाडात वाढलेली मुलगी होती, चटचट काम करणं तिला सुचायचं नाही,सगळं तिला हातात लागायचं. उशिरा उठल्यावर ती पाहुण्यांसारखी बसून राहायची मग नवीनच लग्न झालंय म्हणून सुमातीबाई तिला काम सांगायची नाही,बरेचदा चहा तिला बेडरूममध्ये आणून द्यायची. कधी कधी राकेश तिला चहा नाश्ता बेडरूम मधेच आणून द्यायचा, त्यामुळे मुळातच आळशी