प्रवास

  • 6.1k
  • 4
  • 2.5k

प्रवास (कादंबरी) अंकुश शिंगाडे ते दिवसामागून दिवस जात होते. शंकरची तिरुपती बालाजीला जायची इच्छा होती. परंतु त्याला योगच येत नव्हता. अशातच तो कोणालाही विनवीत होता की ते जर तिरुपती बालाजीला जात असतील तर त्यांनी तसं सांगावं. तोही तिरुपती बालाजीला जाणार. शंकरला तिरुपती बालाजीला जाण्यापुर्वी तिरुपती बालाजीची पुसटशी माहिती होती. तिरुपती बालाजी.........हे आंध्रप्रदेशातील एक स्थान आहे. या स्थानी प्रत्यक्ष विष्णू भगवान निवास करतात असं भावीकांचं म्हणणं होतं. तसंच काही लोकांचं म्हणणं होतं की तिरुपती बालाजी हा पैसे वाल्यांचा देव आहे. तिथं फक्त पैसाच चालतो. ज्याच्याजवळ पैसा जास्त. तोच तिरुपती बालाजीला जावू शकतो. तसं पाहता तिरुपतीला जाणं हे अवघडच काम आहे. शंकर