गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - अंतिम भाग

  • 8.9k
  • 4.9k

एक आठवढ्यापुर्वीच रत्नेश च वर्गातल्या आणि हॉस्टेल मध्येच राहणाऱ्या दांडगट मकरंद शी भांडण झालं होतं, मकरंद नेहमीच रत्नेश ला चिडवायचा, सतत त्याला taunt मारायचा,रत्नेश चा शांत स्वभाव बघून तो जास्तच चेकाळायचा, आम्ही बरेचदा त्याला समज दिली होती पण तो म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपुटच होता,समज दिल्यावर काही दिवस शांत राहायचा आणि परत मूळ पदावर यायचा, वास्तवात रत्नेश च्या हुषारीवर तो जळायचा,सगळे प्राध्यापक रत्नेश चं कौतुक करायचे ते त्याला सहन व्हायचं नाही. पण म्हणून तो एवढ्या खालच्या थराला जाईल? विचार करता करता अचानक मला सुचलं आणि लगेच मी विघ्नेश ला रूममध्येच थांबायला सांगून कॉलेज मध्ये गेलो तिथे देशपांडे सरांची परवानगी घेऊन मी