ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 12

  • 4.6k
  • 2.6k

प्रकरण १२ पोलीस चौकीत आल्यावर सौम्याने पुन्हा निक्षून सांगितलं , “ मला फोन करायचाय.” त्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. “ आम्ही तुझ्यावर आरोप पत्र दाखल केलं की मग तुला फोन करता येईल तुझ्या वकिलाला.” “ माझा हक्क तुम्ही हिराऊन घेऊ शकत नाही.” सौम्यापुन्हा म्हणाली. “ पुन्हा तेच तेच बोलून काही उपयोग नाही होणार ” पोलीस म्हणाला. “ मी माझ्या हक्काची मागणी केली आहे हे तुम्ही ऐकलेच आहे.या संदर्भात कायदा आहे.” “ तुम्ही इन्स्पेक्टरला सांगा हे.” “ ठीक आहे सांगते मी त्यांना.” सौम्याम्हणाली. “ साहेब मोकळे झाल्यावर भेटतील तुम्हाला.” “ माझे वकील आणि मालक दोन्ही पाणिनी पटवर्धन आहेत.आणि त्यांना