शापित वळण

  • 7.2k
  • 3.1k

आज त्याचा interview होता. आधीच बाईक लवकर सुरू न झाल्यामुळे त्याला उशीर झाला होता. त्यामुळे घाईघाईने त्याने नेहमीचा रस्ता न घेता एक शॉर्ट कट घेतला. सारखा घड्याळात लक्ष ठेवून तो गाडी चालवू लागला. त्याच्या गाडीने वेग पकडला होता, रस्ता दिवसा ढवळ्या सुद्धा निर्मनुष्य होता. त्याला आश्चर्य वाटलं एवढा चांगला शॉर्टकट रस्ता उपलब्ध असूनही लोकं तो ट्राफिक जॅम झालेला लॉंग कट का घेतात? आता 10 मिनिटात तो त्याच्या interview च्या ठिकाणी पोहोचू शकणार होता. चला आता वेळ होणार नाही आपल्याला. ह्या नोकरीची नितांत आवश्यकता आहे आपल्याला त्यामुळे काही करून हा interview क्रॅक झालाच पाहिजे. असा तो विचार करतच होता की त्याला