प्रकरण १४ न्यायमूर्ती नारवेकर यांच्या कोर्टात रेयांश आणि काया प्रजापति यांचे विरुद्ध प्राथमिक सुनावणी साठी प्रकरण सादर झाले आणि कोर्ट गर्दीने फुलून गेले.याचे कारण,सरकार पक्षा तर्फे ज्येष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर जातीने उपस्थित होते आणि आरोपीचे वकील पत्र पाणिनी पटवर्धन ने घेतले होते.बरेच दिवसा नंतर पाणिनी पटवर्धन आणि खांडेकर यांचे वाक् तांडव, परस्परांवरील कुरघोड्या जनतेला अनुभवायला मिळणार होत्या.मोहक पितांबरे, हेरंब खांडेकर यांचा पट्ट शिष्य हा सरकार पक्षातर्फे खटला चालवणार होता.“ न्यायमूर्ती महाराज, आशा प्रकारच्या प्राथमिक सुनावणी मधे कोणतेही प्रस्तावनेचे भाषण करणे प्रथेस धरून नाही पण तरीही मला ते करावे लगत आहे याचे कारण असे की आम्ही सादर करणार असलेले पुरावे