पॉवर ऑफ अटर्नी - भाग 1

  • 11.7k
  • 7.8k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  १   त्या दिवशी शनिवार होता. पहाटेच विभावरीचं, न्यूयॉर्क हून येणारं विमान  मुंबई एयर पोर्ट वर लँड झालं होतं. भल्या मोठ्या तीन बॅगा घेऊन विभावरी टॅक्सी करून पुण्याला यायला निघाली होती. पुण्याला अकरा वाजता पोचली आणि आत्ता तिसर्‍या मजल्या वरच्या आपल्या फ्लॅट समोर उभी होती, आणि कॉल बेल वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात होती. दार एका तिशीतल्या तरुणांनी उघडलं आणि तो दरवाज्यात प्रश्नार्थक मुद्रा करून उभा होता. एकदा विभावरी कडे आणि एकदा तिच्या सामानांकडे बघत होता. त्याला पाहिल्यावर विभावरी गोंधळली. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या  मैत्रिणीने, सानिकाने दार उघडायला हवं होतं पण हा तर कोणी भलताच माणूस दिसत