पॉवर ऑफ अटर्नी - भाग 3

  • 6.4k
  • 1
  • 4.2k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  ३ भाग २  वरुन पुढे  वाचा आठ दहा दिवस तसेच गेले. पोलीसांकडून काहीच बातमी आली नाही. एक दिवस लंच टाइम मध्ये किशोर ला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी विभावरीला फोन लावला. “हॅलो मी किशोर बोलतोय.” “नंबर सेव केला आहे तुमचा. बोला. काही कळलं का ?” – विभावरी. “नाही. कालच गेलो होतो. मला म्हणाले काही प्रगती झाली तर कळवू. सारखे सारखे येऊ नका. आदल्याच दिवशी तुम्ही पण आला होता असं म्हणाले.” – किशोर.  “हो मला पण तुमच्या सारखंच उत्तर मिळालं. काय करायचं ?” – विभावरी. “आपण भेटूया का ? अर्थात तुम्हाला जर वेळ असेल तरच.” – किशोर.