10,दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात सुप्त पावलेल्या त्या अघटित शक्तिंचा रात्रीच्या काळोखात अभद्र मृत्यूंजय खेळाचा नंगानाच सुरु झाला होता. तिस-या मजल्यावर नरहर पंतांच्या खोलीत फरशीवर बहादूरच सताड उघड्या डोळयांच प्रेत पडल होत. तोंडाचा आ - वासला होता. डोळे मरण्या अगोदर काहीतरी भ्याव द्रुष्य पाहील्यासारखे विस्फारले होते. आपल्या सर्वाँकडेच पाहत होते.. जसच्या तस ते प्रेत खोलीत खाली पडल होत. बहादूरची निर्जीव नजर त्या पेंटिंगवर खिळली होती.. ज्यात नरहरपंतांच कोरलेल फोटो होत. आणि खालची ती घोडाखुर्ची आपोआप मागे पुढे होत मंद गतीने झुळत होती. जणु त्या खुर्चीवर कोणितरी बसल असाव! सुर्यांंशला राहायला दिलेल्या खोलीत . तो पलंगावर झोपला होता. पन डोळे मात्र उघडे होते...