ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 16

  • 5.4k
  • 2.5k

प्रकरण १६ पटवर्धन च्या ऑफिसात कनक ओजस बसला होता. “ पाणिनी, तुला त्या वाकलेल्या मेणबत्तीचा सुचलेला मुद्दा माझ्या बिलकुल लक्षात आला नाही. काय भानगड आहे ही?” “ न्यायाधीशांच्या बरोब्बर ध्यानात आला तो म्हणून बर झालं. सोपी गोष्ट आहे समजायला कनक, साधारण ९९% खून हे जमिनीवरच होतात त्यामुळे पोलिसांना समुद्रावरील वातावरणाचा , तिथे घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज नसतो. एखाद्या दर्यावर्दी माणसाला समुद्र विषयी काही प्रश्न विचारून बघ तो प्रथम भरती आणि ओहोटी याच विषयावर येईल.” “ त्या रक्ताच्या ठशा चा आणि मेणबत्तीचा काही संबंध आहे का? कोणी केले असावेत ते ठसे? काया ने? ” सौम्या ने विचारले. “ ती म्हणतेच आहे की