पॉवर ऑफ अटर्नी - भाग 6

  • 6k
  • 3.7k

पॉवर ऑफ अटर्नी    भाग  ६   भाग ५  वरुन पुढे  वाचा “चला. छान, शिफ्ट करतांना जर काही मदत लागली तर सांगा. मी येईन. आधी सांगितलं तर सुट्टी मागता येईल.” किशोर नी मदत देऊ केली. “खरंच याल तुम्ही ? पण माझी एक अडचण आहे, माझं सामान खूप आहे. तुम्ही पाहीलंच त्या दिवशी, ३-४ मोठमोठ्या बॅगा आहेत. हॉस्टेल वर एवढी जागा मिळणार नाही, तुमच्या कडे ठेवलं तर चालेल का ? काकांच्या कडे जवळ जवळ रोज जागा किती अडते, अशी कुरकुर चाललेली असते.” विभावरीनी तिची अडचण सांगितली. किशोर काही बोलायच्या आतच आईंनी सांगून टाकलं. “अग खुशाल ठेव. सध्या जरी आम्ही, राहत असलो, तरी