ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 17

  • 5.5k
  • 2.4k

प्रकरण १७ पाणिनी ने प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद पागनीस ला आपण कुठे आहोत याचा इशारा केला. त्या नंतर मिनिटा भरातच चित्रांगद पागनीस त्याची बोट घेऊन आला.पाणिनी आणि सौम्या मोठ्या बोटीतून त्याच्या मोटार बोटीत बसले. “ पटकन चालव.आपल्याला एका रोइंग बोटीचा पाठलाग करायचाय.तू आलास त्याचं दिशेनी ती गेली.”पाणिनी म्हणाला. “ रोइंग बोट? मी तर कुणालाच भाड्याने दिली नाहीये.” “ ते काहीही असो.अत्ता फक्त आपल्याला त्याला गाठायचं आहे.”पाणिनी म्हणाला. “ हे काम सोप नाहीये. पाण्यावर धुकं पसरलय, टॉर्च लावला तरी तो आपल्याला दिसणार नाही.कारण ठराविक अंतराच्या पुढे झोत जाणारच नाही.” बराच वेळ त्यांनी शोधाशोध केली.आता त्याच्या वल्हवण्याचा आवाज पण येत नव्हता.