पॉवर ऑफ अटर्नी - भाग 8

  • 3.4k
  • 2.1k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  ८ भाग ७  वरुन पुढे  वाचा “तू अकोल्याची आहेस ?” माईंना आश्चर्य वाटलं. “होss. का हो असं का विचारलं ?” – विभावरी. “अग आम्ही पण अकोल्याचेच. तुम्ही कुठे राहत होता ?” – माई. “जठारपेठेत मुकुंद मंदिर आहे न, त्याच्या  मागच्या गल्लीत.” – विभावरी. “आमचं घर पण जवळच आहे. बघ. पृथ्वी गोल आहे. अकोल्यातली माणसं पुण्याला भेटली.” माईनी बोलून दाखवलं. “अहो म्हणूनच आपल्या तारा जुळल्या.” आपोआप विभावरीचं अनुमोदन. “विभावरी,” माई म्हणाल्या, “एक विचारू ? राग येणार नाही ना ? खरं उत्तर देशील का ?” “नाही राग येणार. माई विचारा ना. आणि शेजारी टेबलावर एक पुस्तक होत, ते