विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1

  • 10.5k
  • 5.1k

ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला. "हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. " "गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीच वर ये.", असं म्हणून इन्स्पे. नाईकांनी फोन ठेवून दिला. इन्स्पे. नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमली असल्याने बऱ्याच केसेस मध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे. मी कुहू बीचवर पोहोचलो , तिथे इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पहात होते. "काय झाले इंस्पेक्टर नाईक?", मी इंस्पेक्टर नाईक, "हे बघ ह्या निळ्या कार मध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे." "काय ??? विषारी चॉकलेट ! फारच विचित्र !!", मी "कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिले असेल", इन्स्पेक्टर नाईक "हो! ही