विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 2

  • 7.6k
  • 4.3k

मी रियाचा फोन कसून तपासला तर त्यात तिचं आणि मोहनचं काही चॅट सापडले ज्यामधून रिया आणि मोहन एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे कळून येत होते. मी दुसऱ्या दिवशी रियाच्या कॉलेजमध्ये गेलो. तिथे मी तिच्या सर्व वर्गमित्रांची विचारपूस केली आणि रियाबद्दल काही प्रश्न विचारले. तिचं वर्गातल्यांशी आणि तसेच कॉलेजमधील सगळ्यांशी कशी वागणूक होती त्याचप्रमाणे सगळ्यांची तिच्याशी कशी वागणूक होती कोणी तिचा शत्रू होतं का ह्याची इतंभूत चौकशी केली. महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये मी एकामागून एक रुतुजा, मोना आणि मोहन यांना काही प्रश्न विचारले. "बोल ऋतुजा तुझ्या मैत्रिणी बद्दल तुला काही विशेष माहिती आहे? तिचं एवढयात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं ? काल ती संध्याकाळी