विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 4 (अंतिम)

  • 8.1k
  • 3.9k

पुन्हा मी सांगणं सुरु केलं," हं तर त्या मेसेज मध्ये मोहित ने रियाला कुहू बीच वर संध्याकाळी सात वाजता बोलावलं होतं. तो नंबर वेगळा असल्याने रियाने मोहीतला विचारलं कि हा तुझा नेहमीच नंबर नाही. त्यावर मोहितने मेसेज मधून उत्तर दिलं कि त्याचा फोन चार्जिंग ला असल्याने त्याने तात्पुरता मित्राचा फोन घेऊन मेसेज केलाय. रियाला ते पटलं. तिने कुहू बीच वर येण्याचं कबुल केलं आणि त्याप्रमाणे ती घरून निघाली. तिथे गेल्यावर तिला मोह न दिसता एक वेगळीच व्यक्ती दिसली जिने तिला विषारी चॉकलेट दिलं जे खाऊन ती मरण पावली.", माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच श्री जहागीरदारांचे जावई त्रासिकपणे म्हणाले," अहो डिटेक्टिव्ह राघव!