गहिरे गूढ

  • 5.9k
  • 1.9k

गहिरे गूढ*****************छे चना चटपटा देना भैय्या!",साक्षीने म्हंटल. "ज्यादा तिखा मत बनाव भैय्या!",मी म्हंटल.भैय्या चना चटपटा बनवत होता आणि आम्ही गप्पा मारत होतो. इकडच्या तिकडच्या अभ्यासाच्या लवकरच पंधरा दिवसांनी निघणाऱ्या सहलीच्या आम्ही गप्पा करत होतो. बोलता बोलता माझं सहज भैय्या कडे लक्ष गेलं. त्याचे हात चना चटपटा बनवता बनवता थांबले होते म्हणून माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. तो आमचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकत होता असं मला वाटलं. त्याच्या डोळ्यात वेगळेच गूढ भाव होते. ते बघून मला विचित्र वाटलं."भैय्या रुक क्यों गये? जरा लवकर लवकर बनवा आम्हाला शाळेत सुट्टी संपायच्या आत जायचंय. त्याने भानावर येत मान डोलावली. मी नजरेनेच साक्षीला चूप बसायची खूण