पॉवर ऑफ अटर्नी - भाग 14 - अंतिम भाग

  • 4.7k
  • 2.6k

पॉवर ऑफ अटर्नी  भाग १४   भाग १३  वरुन पुढे  वाचा “आई,” किशोर खट्याळ पणे म्हणाला, “ह्या तर दोनच कृपा झाल्या. तिसरी कृपा पण झाली आहे त्याचा  उल्लेख नाही केलास ?” “आता हे काय नवीनच ? तूच सांग.” माई म्हणाल्या. विभावरी सुद्धा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती. “अग तुझ्या लक्षात कसं येत नाहीये ? विभावरी सारखी इतकी सुंदर, गूणी आणि लोभस सून कशी मिळाली तुला ? हा गोंधळ झाला म्हणूनच न. आता ही कृपाच नाही का ?”  किशोर मिष्कील स्वरात म्हणाला. हे ऐकून विभावरीच्या गालावर गुलाब फुलले नसते तरच नवल. किशोर तिच्याकडे अनिमिश नजरेने बघत होता आणि ते बघितल्यावर ती