प्रवासवर्णन - श्रीमान रायगड

  • 8.9k
  • 2
  • 3.2k

प्रवासवर्णन - || श्रीमान रायगड || दिवाळीच्या सुट्टीनिम्मित सर्व मित्र एकत्र जमलो होतो. सर्वांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही फिरायला जायचा बेत ठरत चालेला, पण जायचं कुठे...? हा प्रश्न सर्वाना पडत होता. दिवाळी म्हणल कि गडकिल्ले आलेच, गडकिल्ल्यांच नाव निघाल आणि मन बालपणात हरवून गेल. दिवाळी म्हणल कि आठवतात फटाके, घरासमोर बनवलेला किल्ला, परीक्षा झाल्या म्हणल कि अगदी पहिल्या दिवसापासून किल्ला बनवायची तयारी चालूच. कोणता किल्ला बनवायचा,  काय काय करायचं, अगदी माती कुठून आणायची ते किल्ला कसा बनवायचा इथपर्यंत...! आणि कानावर नाव पडल श्रीमान रायगड. तस बालपणात हरवलेलं मन पुन्हा वर्तमानकाळात आल. सर्वच मित्र रायगडावर जायला इच्छुक होते.